STORYMIRROR

प्रतिभा बोबे

Tragedy Others

4  

प्रतिभा बोबे

Tragedy Others

अंधश्रद्धा

अंधश्रद्धा

1 min
468

देऊन बळी कोंबड्या बोकडांचा

देव प्रसन्न होईल कसा ?

ज्याने जीवन दिले त्यांना

त्यांच्या नैवेद्याने खुश होईल कसा?


करून गंडेदोरे,जप-तप-मंत्र 

जर झाले असते बरे आजार

डॉक्टर अन् वैद्यकशास्त्रातील

सगळे उपाय ठरले असते नाबेकार ?

 

अंधश्रद्धेच्या मोहाला पडून बळी

घेताल निष्पापांचे जीव किती

स्वसुखासाठी दुसऱ्याचे जीवन

उध्वस्त करताना वाटत नाही का भिती?


सोडा अंधश्रद्धा धरा विज्ञानाची कास

बाळगा वैज्ञानिक दृष्टीकोन होईल विकास 

लक्षात ठेवा यापुढे विज्ञान आहे जीवन

देताल थारा अंधश्रद्धेला तर ओढवून घेताल मरण 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy