STORYMIRROR

आ. वि. कामिरे

Tragedy

3  

आ. वि. कामिरे

Tragedy

अंधाराचा देव मी

अंधाराचा देव मी

1 min
256

अंधाराचा देव मी

अंधारातच जगतो मी

प्रकाशात जरी जन्म माझा झाला

तरी अंधाराचाच आधार मला


लाख ऐकले बोलणे समाजाचे

नाही दिले उत्तर त्यांच्या प्रश्नांचे 

प्रकाशात जगूनही मनात मात्र अंधार राहीला

अंत पाहीलाय कोणी?


त्यामुळे मी देव अंधाराचा जाहला

ज्यावेळी नव्हते कोणी सोबत माझ्या 

या प्रकाशमय विश्वात होते दुःख ताजा

त्यावेळी अंधारानेच केली पट्टी मनाला


अन् केली सुरुवात नव्या नात्याला

माहीत नाही हा चमत्कार कसा झाला?

पण प्रकाशमय दुःखामधे

तो अंधारच होता ज्याने नाही धोका दिला


कृपेने तयाच्या आज जीवंत आहे मी

नाहीतर मेलो असतो केव्हाच

फक्त क्षुल्लक कारणालाच

माझ्या मित्र कृपेने पुन्हा शकतो बोलू


दुःखाच्या प्रसंगीही

मी शकतो स्वतःस सावरु

म्हणून तर अंधाराचा देव मी

अंधारातच जगतो मी....!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy