अनाथ
अनाथ
1 min
385
पृथ्वीतलावर जन्म घेतला
आपण सगळे एकसमान,
कुणी न मोठा कुणी न छोटा
होऊ नये कुणाचा अपमान
अघटित घडूनी कुणी पोरका
झाला इथे दुर्दैवाने,
हाक देऊनी मायेची तुम्ही
साथ द्या त्यांना प्रेमाने
असे कुणामध्ये प्रतिभा मोठी
द्यावा त्यांसी तुम्ही विश्वास,
हिम्मत कधी तुम्ही हरू नका रे
सोडू नका शिक्षणाची कास
पुढे जाऊनी यांच्यामधला
कोणी करेल असे कार्य महान,
करेन कौतुक दुनिया सारी
वाढेन या देशाची शान...!!!