अनामिक ओढ
अनामिक ओढ
मनाला स्पर्शून
जाणार नातं तुझं
कधी गुंतले मी त्यात
कळलंच नाही मला माझं
तुझी अनामिक ओढ
राहिले ना मी माझी
नसता तू आसपास
दिसते मला छबी तुझी
तुझ्या आठवणी आता
रोज मनाला छळतात
तुझ्या डोळ्यातील भाव
आता न बोलताही कळतात
तुला भेटण्याचे आता
रोज शोधते मी बहाणे
लाजेने खुलतो चेहरा माझा
तुझ्या जवळ येण्याने
अबोल प्रीतीची भाषा
दोघेही समजून घेऊ
अखेरच्या श्वासापर्यंत
एकमेकांना साथ देऊ

