STORYMIRROR

Pandit Warade

Classics

3  

Pandit Warade

Classics

अमृताच्या धारा

अमृताच्या धारा

1 min
482


आलं आभाळ भरून 

दिशा झाकोळल्या दाही

झाला आनंद सृष्टीला

फुटे आनंदाची लाही।।१।।


मेघ गर्जना करती,

वीज कशी चमकते

पावसाच्या सरीसाठी

जणू रस्ता दाखवते।।२।।


आला पहिला पाऊस 

शेतकरी सिद्ध झाले

पीक लागवडी साठी

बैलं औताला जुंपले।।३।।


आला पहिला पाऊस

झाडे वेली चिंब झाल्या

अमृताच्या धारां मध्ये

कशा न्हाऊन निघाल्या।।४।।


आला पहिला पाऊस

सृष्टी न्हाती धुती झाली

बीज अंकुरे कुशीत

धरा हिरवाई ल्याली।।५।।



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics