STORYMIRROR

Sanjana Kamat

Inspirational

3  

Sanjana Kamat

Inspirational

अक्षरगंध

अक्षरगंध

1 min
229

अक्षरगंध झुले मनामनात,

काळजात सडा चांदण्यात...

उजळती लाख ज्योती लेखणीत,

केशरी शुभ्र प्राजक्त उधळीत...


अक्षरगंध नक्षत्रांचे जणू मोती,

रोमरोमी कुसुम बहर फुलवीत...

मनोहर किर्ती नभांगण बदलत,

रम्य नीरव स्वर्ग हळूहळू उतरवीत...


गुंफली मी भावना काळजातील,

आठवणीच्या पापणीत बिलगलेली...

अबोल होऊन निवांत विसावलेली,

अक्षरगंधाने पुन्हा पालवी फुटलेली...


शब्दात गुंतले अक्षरगंधाचे मोती,

अस्तित्व शोधे जगी मायाजाळ्यात...

मन आणि मेंदूच्या खेळात तळमळत,

अक्षरगंधांची नौका वादळी झंझावात...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational