अजूनही ती उपेक्षित
अजूनही ती उपेक्षित
खरंच अजूनही ती
उपेक्षित आहे
स्त्री जातीची उपेक्षा
होतच आहे
जन्मापासून अखेरपर्यंत
न्यायासाठी आजची स्त्री
स्वतःला सिद्ध करण्या
झगडत आहे
वारसा गातो जिजाऊचा
तिलाच आता विसरलो
शक्तीविना सर्व शून्य
असा कसा पाषाण झालो
महती गातो स्त्री शक्तीची
घरात मात्र उलटा न्याय
कधी तरी सावित्री
मोकळा श्वास घेईल काय?
सभेमध्ये मातृदेवो भव
घरी आल्यावर विसरून जाय
असा कसा दुटप्पी माणसा तू
कधी तरी सुधारणार की नाय?
