STORYMIRROR

Ashok Shivram Veer

Romance

3  

Ashok Shivram Veer

Romance

अजूनही असं वाटतं...

अजूनही असं वाटतं...

1 min
200

अजूनही असं वाटतं... 

कोणीतरी आपलं असावं, 

प्रेमाणं जवळ घेऊन सुख-दुःख पुसावं. 

अजूनही असं वाटतं... 

कुणा नाही पटलं तर लटकंच रुसावं, 

क्षणात सारं विसरून शेजारी बसावं. 

अजूनही असं वाटतं... 

दुसऱ्यानं कसं समजून -उमजून बोलावं, 

अन एकमेकांच्या चुकांवर पांघरूण घालावं. अजूनही असं वाटतं... 

सारं कसं छान छान असावं, 

वेळ येताच एकमेकांच्या कुशीत घुसावं.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance