STORYMIRROR

Padmakar Bhave

Classics Inspirational

3  

Padmakar Bhave

Classics Inspirational

ऐसा वसंत

ऐसा वसंत

1 min
218

वसंत माझ्या दारी येऊन

सडा शिंपतो पुष्पांचा

चराचरात एक बीज पेरूनी

स्वतःच होतो चैतन्याचा


ऐश्या एका सोनसकाळी

वसंत झाडांवरती वसतो

आणि दिवस मावळताना

मला वसंत चंद्रि दिसतो


रात्रीच्या कुशीत शिरूनी

वसंत चांदवा रंगवतो

कुहू कुहू चे गान घेऊनी

आम्रतरूला जागवतो


अश्याच वेळी होऊन कविता

वसंत शब्दांमधून येतो

अलगद वहीच्या पानांवरती

खुणा हिरव्या ठेवून जातो...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics