ऐंशीतला राजा, सत्तरीतली राणी
ऐंशीतला राजा, सत्तरीतली राणी
ऐंशी वर्षाचा राजा आणि सत्तरीतली राणी
वृध्दाश्रमात फुलत होती त्यांची प्रेमकहाणी.
आज्जीचा तो लिंबाएवढा अंबाडा, आजोबांचे ते भोपळ्या एवढे टक्कल
अनुभवाचे होते त्यांच्या सोबती.
आज्जी म्हणे,एके काळी मोगऱ्याचा गजरा होता मला प्राणप्रिय.
माझा सखा माझी आवड जपायचा. गुपचूप आणून माझ्या केसात माळायचा.
पुरणपोळी माझी प्राणप्रिय, माझी सखी दर सणाला आवर्जुन करायची,
गरमागरम पुरणपोळी तुपाने माखुन खाऊ घालायची.आता पोळी गेली तुप गेले. आजोंबा सद्गदित झाले.
एकमेकांच्या आवडी, निवडी जपत संसार आम्ही केला.
संसारात सुखदुःख भरपूर झेलले. सगळी सुखे मुलांबाळांच्या पायाशी ठेवले.
आपल्याला नाही मिळाले ते मुलांना मिळाले तिने मात्र मला अर्ध्या रस्त्यावर सोडले.
आज्जीचाही प्रवास नव्हता याहुन निराळा. कडक शिस्तीचा स्वभाव इकडचा, प्रेमाचा प्रकार वेगळा.
उमेदीच्या काळात नोकरी केली. स्वकर्तृत्वाने आपली दुनिया उभारली, परमेश्वराने मात्र घडी सगळी विस्कटली.
दोघेही समरस होऊन बोलत होते. आपले सुखदुःख ऐकमेंकाशी वाटत होते.
आता आधाराची गरज होती. मुलाबाळांना ती अडचण भासत होती.
स्वखुशीने वृध्दाश्रम पर्याय निवडला. आता उतरणीच्या वाटेवर हा आधाराचा मार्ग गवसला.
दोघांचेही स्वभाव जुळले.आपण एकत्र
राहू या हे सहमतीने ठरले.हे अनोखे प्रेम
मुलांच्या पचनी नाही पडलेपण याचे होते ठरले.
आज्जीच्या केसातील चांदी, आजोबांचे टक्कल,
याचे मैत्र जुळले. आजोबांची काठी आणि
आज्जीचा चष्मा यांनीही एकमेकांना मनापासून स्विकारले.
"शेवटी मिय्या बिवी राजी तो क्या करे काझी"
स्वभाव जुळले. राहिलेल्या अशांना नवे
मार्ग गवसले. मावळतीच्या सुर्यनारायनाच्या
साक्षीने दोघांनेही एकमेकांना मनापासून स्विकारले.
ताऱ्यांच्या रूपात तिचा सखा,त्याची सखी,
हा सोहळा नयनात साठवत होती.
दोघांवर मनापासून
शुभेच्छाच्या सुमनांची बरसात करत होती.

