ऐकणं
ऐकणं
ऐकणं,
उघडे ठेव , खिडक्या, दरवाजे सर्व,
मुक्त वाऱ्याला आत येऊ दे,
झोंबुदे तुझ्या अंगाला,
शहारे येऊ देत अंगावरती,
तू सैर कर जगाची,
ऊन-वारा,
समुद्र -समुद्राच्या लाटा ,
सुख-दुःख,
प्रेम-राग,
मैत्री - विश्वास ,
घात-पात,
जाणून घे झोंबाणाऱ्या वाऱ्यासोबत !
तेवढ्यात,
डोळे अलगद मिटून घे,
पापण्यांवर तुझ्याच हाताचा स्पर्श कर ,
थोडासा दाब ही दे,
अन्,
विचार मनाला ,
" हे जगणं तर नाही ना...?"