STORYMIRROR

परमेश्वर नंदुरकर

Others

2  

परमेश्वर नंदुरकर

Others

जाऊद्यात सुखरूप

जाऊद्यात सुखरूप

1 min
14K


समजेल का कुणी ,

पाहेल का कुणी ,

माझ्या निरागस डोळ्यातली शांतता ,

राब राब राबून अंगात येणारा घाम ,

भुकेनं आतड्याला पडलेली पिळ ,

न सुटणाऱ्या प्रश्नांच्या विचारांमुळे, कपाळावर पडलेल्या आट्या ,

उत्तरांसाठी कोऱ्या कागदावर धावपळ करणारा पेन ,

वाहत्या अश्रूंना बळजबरीने मधी-अधी थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या धडपडी पापण्या ,

लाथ मारेल तिथे पाणी काढणारे पण आज थरथरणारे पाय,

गळून पडलेलं अंग ,

निकामी झालेले बाहू ,

अशुभ घडण्याचं संकेत देणारी सतत उडणारी उजवी पापणी ,

ईजा तर काहीच नाही पण रक्तात माखलेलं अंग ,

आत्ता कुठे मी जगतो आहे या अर्विभावात असलेलं जीवन ,

मी येण्याची वाट पाहणारी माझी चिमुकली ,

बापाच्या मांडीवर रात्र काढण्याचं स्वप्न पाहणारं तान्हं बाळ ,

घराच्या चार भिंतींना माझा लागलेला लळा ,

मी गेलो तरच पेटणारी चूल ,

पाणी देण्याच्या बहाण्यानं मला कवटाळून घेणारी माझी सौभाग्यवती ,

चार-पाच पैश्यात दळभद्री पण आनंदमय माझा संसार ,

सांगा कुणीतरी त्या दंगलीतल्या जीवांना !

इतकं ओझंय म्हणावं माझ्या पाठीवर ,

जाऊद्यात सुखरूप मला माझ्या ....... आनंदमय गरीबखाण्यात !!


Rate this content
Log in