तो रक्त गट विचारत होता....
तो रक्त गट विचारत होता....
1 min
27.8K
तो रक्त गट विचारत होता जणु,
त्याच्या रक्तात माणुसकी असल्यासारखा.
पतीव्रतेवर संशय घेतला त्याने,
हा पवित्र असल्यासारखा.
हिशोब मागत होता विरोधकांना भ्रष्टाचाराचा,
याचा त्यात हात नसल्यासारखा.
आत्ता कुठे ती प्रेमात पडत होती,
मी ताई म्हणालो भाऊ असल्यासारखा.
मी उच्चारणारच होतो फक्त 'भाषणस्वातंत्र्य',
तो पाहु लागला दहशतवादी असल्यासारखा.
तो रक्त गट विचारत होता...
