अगम्य तुझा खेळ
अगम्य तुझा खेळ
अगम्य तुझा खेळ न कळे अकळ ।
ब्रह्मादिक वेडे जाले तेथें आम्हां कैचें बळ ॥१॥
कान्होबा भला भला तुं होसी ।
चोरी करुनि दिसों न देसी रे कान्होबा ॥२॥
चोरुनी शिदोर्या आमुच्या खासी ।
शेखी वळतीया धाडिसी रे कान्होबा ॥३॥
एका जनार्दनीं आमुचा होंसी ।
दास्यात्व करुनी दिसों न देसी कान्होबा ॥४॥