STORYMIRROR

Anita Gujar

Romance

4  

Anita Gujar

Romance

अबोल प्रीत

अबोल प्रीत

1 min
380

अबोल नयनांची प्रीत

शमते मनातील काहूर,

हृदय विणेच्या जुळल्या तारा

आज गवसला ग सूर ||१||


सुख दुःख ही भरती ओहटी

मोहमाया सारीच खोटी ,

कशास मग हवीआस मनात

सर्व सोडूनी जाणे शेवटी ||२||


छळतो मजला वादळ वारा

मनी उठे हुरहूर येतो शहारा

नैराश्याची लाट उसळता

डोळ्यांमधूनी झरती धारा||३||


बघ वसंत बहरला

धुंद वासाने दरवळला

हुरहूर मनात वाढता

मदन वारा सळसळला ||४||


अबोल प्रीत बहरली

आज लाजरी ही प्रीत ,

हुरहूर मनामध्ये ती उठता

कळलं सार गोड गुपीत ||५|


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance