अभंग
अभंग
ओढ लागे जिवा । देवा विठूराया ।
बघ माझी काया । दयनीय ।। १ ।।
खंत मनी झाली । आषाढी चुकली ।
संधी ती हुकली । पांडुरंगा।।२ ।।
आली ही कार्तिकी । उतावळे जीव ।
करा थोडी कींव । विठू माझ्या ।। ३।।
मन माझे नेई । पाऊले चालती ।
भेटण्या मागती । विठोबाला ।। ४ ।।
सावट रोगाचे । सार दूर देवा ।
घ्यावी माझी सेवा । पंढरीला ।। ५ ।।
आस पुरी करा । मागतो मी भक्त ।
द्यावा जरा वक्त । चरणाशी ।। ६ ।।
