STORYMIRROR

Namrata Madhavi

Abstract Tragedy Others

3  

Namrata Madhavi

Abstract Tragedy Others

आयुष्यात आयुष्य जगा

आयुष्यात आयुष्य जगा

1 min
11.7K

आयुष्याची साठी उलटली पण 

जगणंच राहून गेलं..


कॉलेज खूप केले पण 

बिझी शेड्युलला बंक मारणंच राहून गेलं..


पोरी खूप पाहिल्या पण 

एखादीला पटवनंच राहून गेलं..


निजून निजून रात्री घालवल्या पण

निशाचर व्हायचं राहूनच गेलं...


मोगरा, रातराणी झालो पण 

गुलाब व्हायचं राहूनच गेलं...


हॉटेलमध्ये खूप खाल्ले पण 

टपरीवर चहा प्यायचे राहूनच गेलं..


थेअरी खूप रटली पण 

प्रॅक्टिकल करायचं राहूनच गेलं..


म्हणून आज रात्र जागवतोय कारण 

रात्र अनुभवायची राहूनच गेली...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract