Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Namrata Madhavi

Others

4.5  

Namrata Madhavi

Others

मैत्री

मैत्री

1 min
194


आयुष्याच्या प्रवासाला 

मैत्रीची जोड मिळावी ,

खडतर वाटेवर चालताना 

सतत सोबत असावी .


फुलांच्या सुगंधाप्रमाणे 

नेहमी दरवळणारी हवी ,

विश्वासाने पावलोपावली 

मदत करणारी राहावी .


मैत्रीमध्ये बोलायला 

शब्दांची गरज नसावी ,

सुख असो वा दुःख 

भागीदारीची असावी .


शब्दांची गुंफण करताना 

जशी वाक्य बनवी ,

एकटे कधी असताना 

तुझ्या मैत्रीची साथ असावी .


Rate this content
Log in