STORYMIRROR

Namrata Madhavi

Romance

3  

Namrata Madhavi

Romance

तू... फक्त तू...

तू... फक्त तू...

1 min
298

हरवलेल्या कोमेजलेल्या जीवनाला माझ्या 

जगण्यास आधार दिलास तू...


अबोल मुक्या मुखाला माझ्या 

बोलण्यास सज्ज केलेस तू...


ओसाड उजाड जमिनीवर या 

हिरवळ उगवण्याचा प्रयत्न केलास तू...


बेरंगी दिशाहीन आभाळात या 

इंद्रधनुष्याचे रंग खुलवलेस तू...


अळवावरच्या पानावरच्या आयुष्याला 

घटपर्णीचे आयुष्य दिलेस तू...


भावनेच्या ओघात वाहताना मला 

आठवणींच्या सागरात बुडवले तू...


पावसाच्या सरीत भिजताना मला 

थंडीत धुक्यात सापडलास तू...


स्वप्नांच्या दुनियेत वाटचाल करताना मला

आयुष्यभराच्या प्रेमाची साथ दिलीस तू...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance