आयुष्याच्या सहवासात
आयुष्याच्या सहवासात
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
आयुष्य हे जणू एका तारकाप्रमाणे
पुर्ण अवकाशात चांदण्याप्रमाणे चमकणारे
एकदाच येऊनी मनभरून असणारे
एकदाच जिवनाला चमकवणारे
आयुष्याला लाभलेले सहवासी
जणू त्यांच्यामुळेच इथली रहिवासी
त्यांच्यातील आनंदाची मी ऋणी
जणू त्यांच्यातली मी एक सुखी
आयुष्यातल्या वाटा असताना
सुखी जीवनाची चाहुल
तुझी साथ मिळाल्याने
नांदते जीवनी सुख
आयुष्य किती छान वाटतयं
तुझी सुखाची सोबत असताना
आयुष्याच्या या नाजुक वळणावर
तुझ्या साथीची गरज
आयुष्यात तुच येण्याने
फुललेली प्रेमाची हिरवीगार हिरवळ
आयुष्याच्या ह्याच काळोख्या वाटेवर
हातावर हात तुझा हवाय
आयुष्य परिपुर्ण होताना
गरज फक्त तुझ्या विश्वासाची
आयुष्य वाटते जिंकल्यासारखे
म्हणुनच आयुष्याचा सहवास
तुझा वाटतोय हवाहवासा