आयुष्याची पहाट...💭
आयुष्याची पहाट...💭
आयुष्यात माझ्या एक अशी.... सोनेरी पहाट असावी...
नसेल कुशीत तू कधी.... पण स्वप्नांत मात्र दिसावी...
अनोळखीच असावा चेहरा तुझा...त्यातच मी गुंताव...
कोवळ्या पहाटेच्या सुर्यकिरणांत... पुसटस तू दिसावं..
रमता ,रमता स्वप्नांत तुझ्या...दिवसाने बाजी मारावी..
थंडीच्या त्या गोड धुक्यात... अलगद मशाल पेटवावी..
घट्ट मिटलेल्या त्या डोळ्यांचा ..प्रकाषाशी लपंडाव चालावा...
नको ,नको म्हणत म्हणत,घड्याळाचाही तोल जावा...
वेळेचं भान आल्यावर... स्फुर्तीत उठून बसावं...
मिटलेल्या डोळ्यांनी मात्र...तुलाच पाहून हसावं...
खूप सुंदर असावं... मी, स्वप्नांत तुला पहाणं...
न भेटताही बघितल्याच... डोळ्यांचं रोजच बहाण...
अनोळखी ती स्वप्नांतली भेट...तु मिळेपर्यंत चालावी...
आयुष्याची प्रत्येक रात्र...तुझ्यासोबत जगून काढावी..
गुंतता ,गुंतता तुझ्यात मी...तू एवढी खास व्हावी....
जीवनात सोबत भेटलीस तरी.... स्वप्नांतही तूच रुजावी..