"आयुष्याचे चार दिवस"
"आयुष्याचे चार दिवस"

1 min

190
मुलगा वा मुलगी,
आम्ही फक्त आई-वडील
दोघांना एकच शाळा
सारखं सगळं आमच्या कडील..
एक दागिना नि साडी
शिल्लक असते ताईला
पेन्शन दोघांच्या नावावर
घर ,शेती कधीकधी मुलाला..
आजारपणात वेळ मुलीचा
धावपळ असते सुनेची
बिल भरतो मुलगा
मदत असते मुलीची.
सासरी देते तीही जीपीएफ
आईला विचारते हवं नको
लेक-सुन तिच्याच भूमिका
तिलाही तृप्तीचा भाव नको?
नाव माहेरचं ,पगार सासरी
दोन्ही स्तुतीला आसुसते बिचारी
लेकरं तान्हे तेव्हा व्यस्त सारी
वृद्ध झाले की हक्काची बारी.
घर टिकवाया उभा जोडीदार
बाजू नाही घेऊ शकत तो लाचार
दिवस असतात आयुष्याचे चार
कुठेही रहा, मनीठेवा उच्च विचार!