आयुष्य एक परीक्षा
आयुष्य एक परीक्षा
जीवन जगणे एक कला
आनंद असे आगळा...
न दिसे सुख डोळा
दुःख मात्र सतरा सोळा.....
नीज नासे रात्री चिंता
पहाटेस डोळा लागता
दिसतो मोह मायेचा पसारा
असे कर्मभोग सारा.......
का रे मना अधीर असशी
परीक्षेस उतावीळ होशी
नश्वर देह आणि आयुष्याचा
का रे मोह करिसी वेळोवेळा......
आयुष्य म्हणजे एक परीक्षा
सुख बक्षीस दुःख शिक्षा
गुलाम म्हणून नियतीचा
फासा फिरतो गरगरा......
