दोन घडीचा डाव...
दोन घडीचा डाव...
1 min
265
म्हणे आयुष्य म्हणजे
असे दोन घडीचा डाव..
एक घडी सुखाची
तर एक असे दुःखाची..
संसार म्हणजे मानू या सुख
तर उरलेच नाही ही कसलेही दुःख
उगवत्या सूर्याला नमन करून
सांजवेळेची वाट पाहूया...
दुसरीकडेे परमेश्वराची
आराधना अनमोल साची
दुःख नुरे खचितच क्षणी
तल्लीन होऊन जााऊ या...
आनंदाने उत्साहाने
साजरे करू दिन सारे
हसतमुख चेहऱ्याने
परमेश्वरा समर्पित होऊ या....
