कातरवेळ..
कातरवेळ..
1 min
288
आयुष्याच्या मध्यान्ह काळी
कासावीस होतो जीव
तारुण्याची अबोल देणी
मनी उभारुनी देती किव..
त्या दिवसाच्या शेवटच्या क्षणी
अन् रात्रीच्या सुरुवातीला
आठवते प्रत्येक वचन
थरथर होई क्षणाक्षणाला
शांत होय मन
अन् डोळेेेे मिटती..
आठवण प्रत्येक क्षणाची
होऊनी रोमांच फुलती...
ती गेली चाहूल आता
मनीचे काहूरही गेले
पण आजही कातरवेळी
क्षण अबोल निर्जीव झाले...
