जन्म हा स्त्रीचा ...
जन्म हा स्त्रीचा ...
1 min
182
धन बलाढ्य सद्भाग्य माझे
मिळाले दान हे स्त्रीत्वाचे
निती शुद्धतेच्या शिखरावरती
ब्रम्हानंद मिळवण्याचे.....
असो माहेरची चिंता
असो सासरची भीती
कितीही आली संकटे
तरी सोडीत नााही नीती...
नसे घराची मालकी
नसे कसलेही स्वातंत्र्य
सगळी बंधने घट्ट बांधूनही
असे मोकळा श्वास घेण्याचा छंद....
सरत येते तारुण्य
सरत येतो उत्साह
पण सरता संपत नाही
धडपडण्याचा स्वभाव....
