माझी न राहिले मी..
माझी न राहिले मी..
1 min
254
स्वर पडला अलगद कानी
डोकावले दारी पाहिले तुला
अनु पाहताच तुला त्या क्षणी
माझी न राहिले मी...
इतिहासाची सुंदर किनकिन
अन् बोलाची तुफान किलबिल
ऐकतच तासन्तास
माझी न राहिले मी...
एक दिवस तुझे न दिसणे
म्हणजे असे जन्मभरी सजा
तुझी वाट पाहता पाहता
माझी न राहिले मी...
तू दिसता दुसऱ्या जवळी
होई रागाने मनाची होळी
ती आग शमवता शमवता
माझी न राहिले मी....
