सांग तू होतास का...
सांग तू होतास का...
1 min
227
लग्नगाठ बांधताना
भविष्य माहीत असूनही
वाट दाखवाया मजला
सांग तू होतास का....
गेले बाबा नकळत क्षणी
काहूर उठले मनोमनी
पोरकेपणाला आधार द्याया
सांग तू होतास का....
अपमानित होता क्षणोक्षणी
स्वाभिमानाची होळी मनी
मायेची ऊब द्या या
सांग तू होतास का....
भावनांची मिटली कवाडे
सूडबुद्धीची उघडली दारे
मानसीच्या वादळा क्षमवाया
सांग तू आहेस का.....
