आठवणं तुझी
आठवणं तुझी
आठवणींचा वा-याचा मी श्र्वास घेतो,
श्र्वासचा सुगंध मी कां ओळखतो?.
सुगंधाने आजही मन कसे डोलवते,
तुझा श्र्वास जुनु माझ्याशी बोलते.
नजरेतुन जशी तु हृदयात ऊतरली,
हृदयाची पोकळी कायमची भरली.
पण तु जीवनसाथी नाही झाली,
भरलेली जागा कशी रिकामी करावी ?.
हृदयातील घरात जर तुच असती,
संसाराची गाडी वेगाने धावली असती.
पत्नींच्या कट-कटीने विचलित होतो,
आठवणींचा वा-याचा मी मग श्र्वास घेतो.
अफाट विरह तुझा मला कां जानवतो,
अर्धांगिनित तुझे प्रतिबिंब मी बघतो.
मीच कां यात कुठे, कसा नेहमी चुकतो,
हे समजण्यास मी असमर्थ असतो.
काळाची साथ जर मला मिळाली असती,
मग तर तुच माझी अर्धांगिनी असती.
पत्नीचे हेच रुप कां मी बघीतले असते,
काही नविन अनुभुति मला झाली असती.

