STORYMIRROR

manasvi poyamkar

Romance

4  

manasvi poyamkar

Romance

आठवणीतली सर...

आठवणीतली सर...

1 min
359

ह्या नभाने पाहिले

मला तिच्यासाठी तरसताना

मग पसरला गारवा

ह्या सारी बरसताना....

तिचा हलकेच कटाक्ष

माझ्या प्रेमाची कबुली देत होता

थेम्ब ओघळतना गालावरी

माझ्या हृदयाची कहिली करत होता....

आज ही आठवते तिची बावरलेली नजर

हसू होते गालावरी, मनी भितीचा कहर

बोलावे काय अन कसे

दोघानाही कळत नव्हते

जे माझ्या मनी तेच असेल का त्याच्या मनी

हेच कोडे उमगत नव्हते.....

सर थांबली पावसाची अन पावले वळली

न बोलता नयनांची भाषा नयनांना कळली...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance