STORYMIRROR

Sunil Khaladkar

Romance Tragedy

3  

Sunil Khaladkar

Romance Tragedy

आठवणीतील पाऊस....

आठवणीतील पाऊस....

1 min
189

आज पुन्हा भरले मनात,

पावसाचे पाणी...

काय सांगू मित्रांनो,

आमच्या प्रेमाची कहाणी...


मुसळधार पावसात, जेव्हा

तिला केला होता प्रपोज़..

मला ती हो म्हणताना,

वाटली होती भिजलेले सुगंधित रोज...


भेटताना आम्ही नेहमी,

छत्री घेऊन यायचो....

आनंद प्रेमाचा अनुभवायला,

दोघेही पावसात भिजायचो..


रोज रोज भेटायची आता,

आम्हाला लागली होती सवय..

पावसानेही कधी बरसायला,

केली नाही हयगय...


पण एक दिवस तिला यायला,

खूपच झाला उशीर...

तिच्या न येण्याने,

मन झाले अधीर.....


नियतीने त्या दिवशी,

केला होता घात..

घाईत रस्ता ओलांडताना,

तिचा झाला हो अपघात...


अनेक वर्षे गेली लोटून,

आता पावसात मी जात नाही..

त्याचे सुंदर बरसणेसुद्धा,

पहिल्यासारखे पाहत नाही.….


पावसाच्या प्रत्येक थेंबात,

आज ती मला दिसली...

काळ्या ढगातून मला पाहत,

गालात गोड हसली......


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance