STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Romance

2  

Abasaheb Mhaske

Romance

आठवणीत तुझ्या

आठवणीत तुझ्या

1 min
350

आठवणीत तुझ्या सदैव असावे 

विसरू पाहता पुन्हा आठवावे

गुज मनीचे कसे ओळखावे?

प्रश्न निरंतर मज पडताना


न बोलताही तू बोलून जाते  

डोळ्यांची ती अनिवार भाषा 

अंतराची ती माया कळू दे ना

प्रेम आहे, नाही तरी कसं म्हणावं?


तू वाटे हवीहवीशी

हवाहवासा सहवास तुझा 

दशा म्हणू की तीच दिशा 

प्रेमनगरातील मी गं नवखा 


वाट्टेल तेव्हा येतेस स्वप्नी  

आठवतेस वेळी - अवेळी

तूच दिसतेस अवतीभवती 

व्यापून टाकलेस तू समग्र जीवन 


स्वप्न म्हणू की भास म्हणू 

शाप म्हणू की उपहास म्हणू 

केवळ आकर्षण की प्रेम गडे 

होशील माझी खरं खरं सांग सखे  


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance