STORYMIRROR

siddheshwar patankar

Romance

3  

siddheshwar patankar

Romance

आठवणींचा शामियाना नकळत उभारला

आठवणींचा शामियाना नकळत उभारला

1 min
278

आठवणींचा शामियाना नकळत उभारला जातो 

प्रेमाच्या दलालीचे खांब रोवले जातात 

हळुवार एकेक आठवण नकळत 

त्या खांबावरून वेलीसारखी चढत जाते 

मग विरहाचे ऊन

 सावलींनी झाकले जाते 


ती प्रत्येक भेट , ते स्थळ ,

 ते एकत्र घालवलेले क्षण

असेच बिलगून असतात 

डोळे बंद करताक्षणी 

झपकन पंख पसरतात 


तू होतीस तेव्हा सुद्धा आणि तू नसताना पण 

हे सारे माझे अबोल साथी असतात 

शामियाना असाच उभा असतो 

मी मात्र तळमळून त्याखाली 

नित्य तुझी वाट पाहत असतो  



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance