आठवणी
आठवणी
कॉलेजचे ते दिवस परत ना येणार
घे फोटो काढ सेल्फी आठवणी बनणार....
पाहिलं फोटो उघडून
मनाची अल्मारी
सारखी आठवण येते
कॉलेजची जिथं स्वप्नं सारी
कॉलेजच्या गोष्टी कानी ना पडणार.....
खूप रुबाब होता ती मुलींची राणी
सोबत माझ्या तिच्या प्रेमाची कहाणी
सांग तुला मी परत कधी पाहणार.....
बदलून बदलून तेच कपडे घातले
किती वेळा मी कॉलेज बंक मारले
सार हरवलं तुम्हाला कोण ओरडणार.....
मरोळ डेपोत सारे भेटत होतो
मौज मस्तीचे क्षण मैत्रीत लुटत होतो
संगम आता मैत्रीच हवामान बदलनार.....
