आठवण
आठवण
तुझ्या आठवणीत
जागलो मी सारी रात्र,
वेडा म्हणतात तुझ्यासाठी
सारेच माझे मित्र!
तुझ्यासाठी वेडा होण्यात
वेगळीच आहे धुंद,
दिवसेंदिवस अतूट होतोय
आपल्या प्रेमाचा बंध!
प्रेमाचे आपले बंधन
करू असेच अतूट,
जुळलेल्या आपल्या हृदयात
कधी ना पडणार फूट!
फुटल्या या नयनी
तुला पाहून आसवांच्या धारा,
तू का येत नाही
करून विचार एवढा सारा!
सारा दिवस आणि रात्र
मी तुझ्याच साठी झुरतोय
क्षणाक्षणाला तुझ्याविना
मी कितीदा मरतोय!

