आता विसरावं म्हणतोय सारं
आता विसरावं म्हणतोय सारं
किती पावसाळे आले
किती पावसाळे गेले
पण तू येण्याची ओढ मात्र
कधी संपलीच नाही
पुन्हा पावसाला बोलावलं आहे
जराशी पदर आवरून
थोडंस बावरून तू येशील
अन पुन्हा बघ तू स्वप्नात नेशील
आता विसरावं म्हणतोय सारं......
कारण पुन्हा पाऊस येणार
पुन्हा जखम ओली होणार
पाहशील तेव्हा घाव सलणारे
दिसतीलही तुला अश्रू सोबत चालणारे
घाबरू नकोस कारण मला सवय आहे
एकटं एकटं झुरण्याची आणि रडण्याची
तुझी मिठी सहाजिकच मिळणार नाही
आता नजर तुझ्या जवळ खिळणार नाही
आता विसरावं म्हणतोय सारं......
कारण पुन्हा पाऊस येणार
पुन्हा जखम ओली होणार
उगाच मी पुन्हा तुझी आठवण काढली
तुझे जुनी पत्र वाचून वाचून फाडली
त्या पत्रांचा सुगंध दरवळला सगळीकडे
मंद सरींचा शिडकाव झाला सगळीकडे
आता नकोस झालंय सर्व
पुन्हा जुने उगवले आहेत ते पर्व
अजून हृदय कठोर झालं नाही गं माझं
इवलंस गाव कोपऱ्यात जपून आहे तुझं
आता विसरावं म्हणतोय सारं.....
कारण पुन्हा पाऊस येणार
पुन्हा जखम ओली होणार
एक कागद अजून जुनाच आहे म्हणून
लेखणी जरा बाजूला सारून ठेवली आहे
त्या कागदावर दोन शब्द गिरवली आहे
पहिली अक्षरे तुझ्या नावाची
तेव्हाच बघ कशी आठवण आली प्रेमाची
तू पुन्हा येशील कविता पूर्ण होईल
आता कविता पूर्ण होणार नाही वाटतंय
कारण विरहाचं आभाळ पुन्हा दाटतंय
विरान काळजावर हलकीचं सरं येईल
पुन्हा मिलनाची चाहूल होईल
आता विसरावं म्हणतोय सारं.......
कारण पुन्हा पाऊस येणार
पुन्हा जखम ओली होणार

