आता नकोस येऊ
आता नकोस येऊ
झाले रे बाबा पुरेसे
आता नकोस येऊ
लय किर्तन वाजले
उगीच कंटाळा देऊ.
कसेबसे नखरे तव
वकृत्व तुझे पाहिले
करणीपेक्षा बोलने
जास्त शब्द पाहिले.
कशास गातो आता
अरे मी पुन्हा येणार
मालगुजारी स्थापून
हक्क तूच सांगणार.
थिजले नेत्र कानही
झालेत आता बधीर
फोटो तुझा रे पाहून
बदलण्यास तेअधिर.
दोन्ही करास जोडून
करतो रामराम तुला
जा एकदाचा येथून
परत येऊ नको मुला.
