STORYMIRROR

Dashrath Atkari

Others

3  

Dashrath Atkari

Others

शब्दांगण

शब्दांगण

1 min
294

प्रित अशी का रूसली

प्रातःकाळी घरात एक

प्रित अशी का रूसली

मुकाट्याने चहाचा कप

कळले ना शब्द कसली.


काल रात्री होता वाहत

प्रितिचा झुळझुळ झरा

काय जाहले सांग सखे

अबोल मनी विचार बरा.


मुक प्रित काही कळेना

कसं समजू गं शब्दांना

कोण वारा पिशाच्चाचा

बंद केलया या ओठांना.


पुरुषमन कसा कळेना

दुधात जल साय येईना

कुठे प्रिती दिसतेय गर्द

स्वर दोघांत घट्ट जुळेना.


न गं न गं..सखे साजणी

मानले तुज नभी चांदणी

नाही मी शुभ्र शितल चंद्र

बसली तू हृदया कोंदणी.


देते टणत्कार तंतू सतारी

तरी जुळवतो ताण प्रिती

मग मधूर स्वर ओसंडता 

संसारातील लोपते भिती.

.....................................


मायेची गोधडी

जुने पुराणे धोतर लुगडे

जोड लावती एकमेकास

जाड सुईदोऱ्याने शिवून

रंगीत ठिगळे सौंदर्यास.


त्या गोंधळी वरती जन्म

आम्हा सर्वांचाच झाला

ती मायेची गोंधळी गडे

तारुण्या दुरान्वये आला.


उन्हाळ्यात माझी आजी

गोधळ्याना शिवत असे

लेकी सुनांना वाटते उब

मायेत आनंदही मिळतसे.


पाहूणे कितीही आले तरी

घरी गोधळ्या बहू असती

गरीब मायेच्या गोधळीत

दादा आत्या मस्त झोपती.


घरी बाळाचा जन्म होता

आठवण गोधळीची येते

बाळाची शी सू सर्वकाही

ती मायेची गोधडी झेलते.


मोठे झाल्यावर ‌ गोधडी

कशी हो दूर्लक्षीत वाटते

कापूस फोम गादीवरती

बघा शरीर कसा नासते.

.................................


काय वर्णू शब्द महिमा

काय वर्णू शब्द महिमा

शब्दची दुधारी तलवार

जणू वाटे शितल चंद्रमा

कधी रे क्रोध तळपणार.


जसा जखमेवर मलम

तसाच वापर शब्दांचा

शब्द हे फुंकर भासती

दाह सर्व उतरे मनाचा.


शब्द भावनिक बनतात

वाहतात अश्रृंच्या धारा

लेक सासरला जातांना

वाहतोना प्रेमाचा वारा.


रागातून शब्द प्रसवतात

जणू ते युध्दाची तलवार

जशा कानामात्रा तळपून

दुज्या मनी करतात वार.


म्हणून सांगणे गड्याला

बोलताना करावा विचार

शब्दांचे नसे कधी विरने

बोलने तसा करा आचार.


मायमराठी शब्दां सौंदर्य

जैसा वापर वाटे मधुरता

तुटलेली मन जोडू पाहते

भिन्न नाती दिसे आतुरता.


Rate this content
Log in