काळजी तिला पोटाची
काळजी तिला पोटाची
1 min
160
कशी रे ईश्वरा विसंगती
कुणी लोळते पैशावरती
नित्य असते पोट चिंता
भागवी सांज घोटावरती
संध्याकाळ आयुष्याची
काळजी तिला पोटाची
घेऊन बसली पणत्यांस
चिंता मनी दोन पैशाची
वयानुसार हवा आराम
लिहिला कुठं नशीबाने
थाटली दुकान छोटीशी
जगणे शिकली धैर्याने
डोक्यावर पदर घेतली
बांगड्या हिरव्या हातात
शुभ लाभ नी पणत्यांना
लावा दिव्यांना अंगणात
सारख्या पणत्या चरात
प्रकाराने जमवून ठेवते
दुकान धंद्या विक्रीसाठी
दिवाळीत उशिरा जेवते
परिस्थितीसापेक्ष संघर्ष
जीवनात करावे लागते
दमून आत्महत्या करने
याने का पुरूषार्थ भागते
