पंगत
पंगत
1 min
178
संगत झाली तेव्हा
पंगत करावी लागते
मानपान थाटबाट
लोक तोंडानं मागते
लग्न कार्यात प्रसंगी
व्याही पंगतीचा मान
लग्नाचा समारोपीय
संपला म्हणती ताण.
एकत्रित कुटुंबामध्ये
जेवण पंगत व्हायची
चूपचाप जेवणानंतर
अभ्यासास बसायची
आता विभक्त कुटुंब
पंगती बसत नाहीत
मेजावर होते जेवण
होतय कूठ गं सोईत
पंगतीत जेवण करता
मोठाच आग्रह होतो
शेवटी वाढण येताना
मानाने घ्यावा लागतो
