माझी माय मराठी
माझी माय मराठी
माझी माय मराठी ही
लावण्याची हो खणी
लिहण्या न् बोलण्यात
नाही पडते कुठे कमी
विवेकसिंधुत बोलली
ज्ञानेश्वरीमधी शोभली
मुकुंदराज- ज्ञानेश्वरा
मराठी आनंदे तोलली
वेद उपनिषदे ज्ञानास
मराठीने हो प्रसारिले
महाराष्ट्रात गावखेडे
तुकोबा गाथेला गायले
जरा जपून मराठीला
वापर करावा दादांनो
एका काना मात्राने रे
बदलतो अर्थ बाबांनो
जात्यावरील ओव्यांत
किर्तनात माय शोभते
भारूड सांगे मतितार्थ
जना ज्ञान मर्म लाभते
माझी माय मराठी हो
गेली साता समुद्रापार
नऊवारी नजाकतीत
शोभे मराठमोळी नार
