STORYMIRROR

Tukaram Biradar

Romance Others

2  

Tukaram Biradar

Romance Others

आता जिथे आहे

आता जिथे आहे

1 min
60

आता जिथे आहे मागे फिरता येत नाही,

माझ्या शिवाय याचा दोष देता येत नाही,


घडले जे जे राहीले जे जे जबाबदारी माझ्यावर,

कालच्या चांदण्यांची किरणं फक्त माझ्याच हातावर,


आपल्या आपण द्यावी सादर आणि झाकून घ्यावे कान,

इतके सोपे कळत नाही, त्याचा ठरलेला अपमान,


उगाच स्वत:स गंभीरपणे आपण आपले घेत असतो,

जाता जाता अर्थ कळेल इतके खरे सोपे असते,


प्रारंभाच्या आधीपासूनच अंत बघत असतो,

म्हणून कोणी थोडे रडून घेत असतो वाऱ्यावरुन


गंधासारखा भिंगत भिंगत मोह असतो,

नको नको म्हटले तरी ओंजळीत उचलून नेतो


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance