आशेचे किरण...
आशेचे किरण...
आजचा कसाही दिवस, उद्या असेल चांगला,
आशा माणसाला नेते पुढे, सामोरे जातो समस्येला...
आपण जिंकणार ही आशाच, संकटावर मात करते,
प्रत्येक प्रयत्नामागे उभी आशा, साथ सोडत नसते...
ज्याच्यात असते योग्यता, त्याच्यात निर्माण होते आशा,
आशापूर्तीसाठी गरज प्रयत्नांची, नाही होणार निराशा..
आशेचे किरण ठेवतात, माणसाला कायम चिंतामुक्त,
ते घेऊन जातात माणसाला, यशाच्या सूर्योदयापर्यंत...
