आरसा
आरसा
अगं, एवढं काय निरखून पाहतेस?
काही नाही रे, माझंच रूप मी निरखतेय
मग काय दिसलं त्या त सांग?
वाट्टेल तसा वाढलेला माझ्या शरीराचा बांधा
नि सौंदर्याचा, सुडौलतेचा झालेला शरीराचा वांदा
पूर्वी कशी होते रे मी अगदी बांधेसूद
चवळीची शेंगच जणू
आता त्याचा जराही दिसत नाही मागमूस
गेली शरीराची पूर्वीची रया
आता काहीच उरली नाही मी तशी पहाया
येऊ लागलंय आता मला रडाया
मन म्हणते, कर आता सुरूवात व्यायामा
