STORYMIRROR

siddheshwar patankar

Abstract Others

3  

siddheshwar patankar

Abstract Others

आपुल्या नात्याचा शिलालेखकल्पला

आपुल्या नात्याचा शिलालेखकल्पला

1 min
119

आपुल्या नात्याचा शिलालेख कल्पला


विषाद नव्हता मनी तो कसला


ना होती मनीषा अन विजिगीषा


पण, पाषाण शोधण्यातच हया गेली


अनभिज्ञ, घन अन नाजूक बंधन


अक्षय संचयात बहू किल्मिषे दाटली


पृथ्थककरणात अन निरूपणात


कैक अमावास्यां पौर्णिमा लोटली


भ्रमिष्ट अस्थिपंजर


शोध कूर्म गतीने पाषाणाचा


अनिर्वचनीय बंधनात अविरत


सोबतीने शोध अस्तित्वाचा


अनावृत, वैचित्र्य, अनाहूत गाठे


यथास्थित स्थितिस्थापक


क्षणभंगुर वाटे


शिरकान, बलिदान ती ज्येष्ठ नाती


पाषाण शोधण्यातच दिली मूठमाती


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract