STORYMIRROR

Ashutosh Purohit

Romance

3  

Ashutosh Purohit

Romance

* आपल्या दोघात...*

* आपल्या दोघात...*

1 min
26.6K


आपल्या दोघात 'फक्त आपलं' असं काहीतरी होतं ना..
दोन इवले धागे गुंफून, नातं विणलं होतं ना..

न बोलता व्यक्त होऊ, असं माध्यम होतं ना...
'आपण फक्त एकमेकांचे' असं कधीतरी वाटलं होतं ना...

कुठलीतरी लांब सफर, फक्त दोघच फिरलो होतो ना..
कुठल्यातरी क्षितिजावर एकत्र आलो होतो ना..

दोन इवल्या काड्या जुळवून घरकुल बांधलं होतं ना..
दोन इवले क्षण लेऊन एकमेकांना वाचलं होतं ना...

दोन सरी पावसाच्या एकत्र झेलल्या होत्या ना...
दोन ठोके हॄदयाचे एकत्र ऐकले होते ना...

मग अशा हळव्या खुणा कधीतरी उघडून वाचतो...
मीच मला माझ्याच आत, कधीतरी वाचून काढतो..

Image may contain: one or more people, people standing, twilight, sky, outdoor and nature


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance