STORYMIRROR

Mrs. Mangla Borkar

Abstract

3  

Mrs. Mangla Borkar

Abstract

आपलीच माणसे

आपलीच माणसे

1 min
230

आपलीच माणसे देतात

आपल्यालाच साथ कधी-कधी

आपलीच माणसे प्रसंगी करतात

आपलाच घात कधी कधी


आपलीच माणसे असतात

जे दाखवितात किरण आशेचे

क्षणिक बदलुन जातात

अन् बिज पेरतात निराशेचे


आपलीच माणसे असतात जी

जीवनाला एक वळण देतात

अन् आपलीच माणसे असतात

जी प्रसंगी सरणं आपलेच रचतात

          

आपलीच माणसे असतात जी

आपल्याच जीवनात फ़ुले फ़ेकतात सुवासाचे

अन् आपलीच माणसे असतात

जे काटे पेरतात टोकाचे


आपलीच माणसे असतात जी

झटतात आपल्यासाठी,दुरवर भटकतात

आपल्यासाठी अन् आपलीच

माणसे असतात

तया जीवना येते ओहोटी

पण दैव फ़िरले की

          

आपलीच माणसे आपल्यासोबत

परक्यासारखी वागतात

पश्चात्तापाच्या दुनियेत या

कधी-कधी मागे परतुनही


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract