STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Children

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Children

आपली मुले

आपली मुले

1 min
202

काम केल्यानंतर मिळणारा

पैसा खर्चावं वाटत नाही

बाप कमाईवर जगणाऱ्यांना

पैशाची पर्वा वाटत नाही


कमवा आणि शिका हे धोरण

लहानपणी अंगिकारले पाहिजे

मुलांचे कळते वय झाले की

स्वतःच्या पायांवर उभे केले पाहिजे


मुलांना कोणतेच कष्ट पडू नये

म्हणून पालक संपत्ती कमावतात

त्यांना काहीच करावे लागत नाही

आयते खाणारे आळशी बनवतात


मुलांना कष्टाळू बनवण्यासाठी

त्यांना काठीचा द्यावा आधार

स्वकमाईने केलेली संपत्ती

हेच जीवनाला देतो आकार


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children