Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Jyoti gosavi

Comedy

3  

Jyoti gosavi

Comedy

आमच्या मुंबईची थंडी

आमच्या मुंबईची थंडी

1 min
165


आमच्या मुंबईतील थंडी म्हणजे 

गरगर फिरणारा पंखा थोडा कमी 

एसी लागणार नाही याची हमी 

राहणार नाहीत घामाच्या धारा

 नॅपकिन टिशू पेपर यांचा पर्स 

मधून कमी होईल पसारा


 आमच्या मुंबईतील थंडी म्हणजे

 लागत नाही मफलर बंडी

 थोडासा स्कार्फ बांधला की

 आमचं काम होतं तमाम

 तरीही कधीतरी दुपारी

 आमच्या नशिबाला असतोच धाम


 हलकीशी एकच चादर 

बास होते अंगावर 

मुंबईत देखील बर्फ पडतो

 कधी ग्लासात कधी सायकल वरून

 तेवढच ऐकलं तरी 

आमचे डोळे येतात भरून


 बाकी बाहेर पावसाच्या धारा

 घरात घामाच्या धारा

 मुंबईचा असतो सतत

 तीस बत्तीस वर पारा


 मुंबईत असतात दोनच ऋतू

 उन्हाळा आणि पावसाळा

 आणि अधूनमधून हीवसाळा 


कोणी शोध लावेल काय

 वातानुकूलित कपड्यांचा

 अहो या मायानगरीत

 भरपूर धंदा होईल त्याचा


शेकोटीचा आनंद नाही

 आमच्या नशिबात

 वाफाळत्या पदार्थांचा आस्वाद

 नाही आमच्या भाग्यात


 हीच आहे या मुंबापुरीची

खासियत तरीही

 जगाच्या कानाकोपऱ्यातून

 लोक येतात येथे धावत


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy