आली आली दिवाळी आली....
आली आली दिवाळी आली....
*आली आली दिवाळी आली,
वसुबारसने सुरूवात झाली
आज करा पूजा गायवासराची,
जाणीव ठेवा मनात त्यांच्या कृतज्ञतेची*
*आली आली दिवाळी आली,
धनत्रयोदशीने सुरूवात झाली
आज करा तुम्ही यमदिपदान,
असताे आज धन्वंतरीला मान*
*आली आली दिवाळी आली,
लक्ष्मीपूजनाने सुरूवात झाली
असते मग नरकचतुर्दशी,
गाेडधाेड फराळ असताे या दिवशी*
*आली आली दिवाळी आली,
अभ्यंगस्नानाने सुरूवात झाली
या दिवशी असते गोवर्धन पूजन,
असताे मग महालय समाप्ती दिन*
*आली आली दिवाळी आली,
भाऊबीजेने सांगता झाली
आहे या दिवशी दिपावली पाडवा,
तुमच्या आमच्या जीवनात येऊ द्या गाेडवा*
